मंगळवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन
            यवतमाळ, दि. 12 : महिलांना त्यांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी मंगळवारी, दि. 16 ऑगस्ट रोजी बचत भवन येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
          ज्या महिलांना लोकशाही दिनात तक्रारी दाखल करावयाच्या आहेत त्यांनी बचत भवन येथे तक्रारी दाखल कराव्यात. न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी तसेच वैयक्तिक स्वरुपाची तक्रार, निवेदन अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे. ज्या महिलांचे तालुकास्तरावर लोकशाही दिनात तक्रारीचे निरसन झाले नाही, त्याच तक्रारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनी सादर कराव्यात. तक्रार सादर करतेवेळी तालुकास्तरीय लोकशाही दिनात सादर केलेला अर्ज आणि टोकन क्रमांकही दाखल करावा, असे कळविण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी