जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम
            यवतमाळ, दि. 25 : जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.
            यानुसार जिल्हा परिषद क्षेत्राची निवडणूक विभागामध्ये आणि पंचायत समिती क्षेत्राची निर्वाचक गणामध्ये विभागणी करून प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्याकडे 9 सप्टेंबर पर्यंत जिल्हाधिकारी सादर करणार आहे. त्यास विभागीय आयुक्त 23 सप्टेंबरपर्यंत मान्यता देतील. त्यानंतर जिल्हाधिकारी 28 सप्टेंबर पर्यंत आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करतील. त्यानुसार 5 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी आणि तहसिलदार पंचायत समिती निर्वाचक गणासाठी आरक्षणाची सोडत काढतील. निर्वाचक गण रचना आणि आरक्षणासह जिल्हाधिकारी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना 10 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करतील. यावर 20 ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करता येतील. प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर विभागीय आयुक्त 17 नोव्हेंबर रोजी सूनावणी देऊन निवडणूक विभाग आणि निर्वाचक गण रचना अंतिम करतील. त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी अंतिम प्रभाग रचना व आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करतील.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी