देशाच्या विकासासाठी सर्वधर्म ऐक्य गरजेचे
-डॉ. रफीक सय्यद
यवतमाळ, दि.24 :देशात आज विविध माध्यमांतून कोणतीही खात्री न करता समाजाला तडे जाईल, असा संदेश पसरविण्यात येत आहे. जगात असलेल्या कोणत्याही धर्माने सांगितली नाहीत, ती तत्त्वे समाजात पसरवून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.या स्थितीत देशाच्या विकासासाठी सर्वधर्म ऐक्य गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ.रफीक सय्यद यांनी केले.ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथील सर्वधर्म प्रार्थना सभेत बोलत होते.उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले अध्यक्षस्थानी होते.प्रमुख पाहुण म्हणून नितीन व्यवहारे उपस्थित होते.
डॉ.रफीक म्हणाले, प्रत्येक धर्माने सद्भावनेचे बीज रोवले आहे.धर्मग्रंथातही आचरण पद्धती सांगितली आहे.एखाद्या विशिष्ट धर्माचा द्वेश हा कोणत्याही धर्मात नाही.धर्म ही प्राचिन असला तरी आधुनिक संत आणि सुधारकांनीही कुप्रथांविरूद्ध आवाज उठविला आहे.धर्माने जीवन जगण्याची पद्धत सांगितली असून ती आजही आदर्शवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राजू जॉन यांनी धर्म परिवर्तन हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते.त्यामुळे बळजबरीने कधीही धर्मातरण होऊ शकत नाही.देशात धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य आहे.धर्म स्विकारत असताना तो धर्म पटवून द्यावे लागते.त्याची इच्छा असल्यासच त्याला धर्म स्विकारण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असल्याचे सांगितले.ॲड. रविशंकर बदनोरे यांनी धर्मग्रंथ हा सर्जरीचे पुस्तक नाही.महापुरूषांनी त्यांच्या आचरणातून आदर्श घालून दिला आहे.धर्मात सांगितलेल्या अनुव्रताचे पालन केल्याशिवाय तो धर्माचे पालन करू शकणार नाही.जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.बावीस्कर यांनी येणाऱ्या विविध सणांमध्ये सामाजिक एकोपा कायम राखून सण साजरे करावे, असे आवाहन केले.
श्री.फुलझेले म्हणाले, देश ज्याप्रमाणे भौगोलिक विविधतेने नटलेला आहे, तसाच धर्म, जात, संप्रदायानेही परिपूर्ण आहे.आजच्या संवाद माध्यमांच्या क्रांतीमुळे प्रत्यक्ष संवाद कमी झाल्याने एकोपा कमी झाला आहे.समाजात एकोपा निर्माण झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, ही बाब प्रकर्षाने जाणविणारी आहे.सामाजिक सलोखा आणि सौदार्हता या रोजच्या जीवनाचा भाग झाल्याशिवाय शांतता प्रस्थापित होणार नाही.
पुरवठा अधिकारी एकनाथ बिजवे यांनी सूत्रसंचालन केले.श्री.आसिफ यांनी आभार मानले.विभावरी घोडे यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी