ऑगष्ट महिन्याचे अन्नधान्याचे परिमाण व दर जाहीर
यवतमाळ, दि. 31 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करावयाचे ऑगष्ट महिन्याचे अन्नधान्याचे दर व परिमाण जाहीर करण्यात आले आहे. निर्धारीत दर व परिमाणानुसार वितरण करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना केल्या आहे.
            कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेले गहू, तांदुळ, साखर, तुरडाळ, केरोसीनचा यात समावेश आहे. बीपीएल, अंत्योदय योजना, अन्नपूर्णा योजना, प्राधान्य कुटुंब योजना, एपीएल शेतकरी तसेच कल्याणकारी संस्था व वसतीगृहांसाठीच्या दरांचा यात समावेश आहे. शिधापत्रिकाधारकांना देय असलेल्या प्रमाणात तातडीने या वस्तूंचे वाटप करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. ज्या व्यक्तींनी धान्याची उचल केली नसेल त्यांना पुढील महिन्यात धान्य वाटप करावयाचे आहे. धान्यवाटप चुकीच्या पद्धतीने होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद