अवयवदान करू, मृत्यूनंतरही जिवंत राहू
* जनजागृती रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद
* अभियानानिमित्त आज विविध स्पर्धा
यवतमाळ, दि. 30 : अवयवदानाच्या जनजागृतीसाठी तीन दिवसीय महाअवयवदान अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गत आज पोस्टल मैदानातून रॅली काढण्यात आली. या रॅलीस जिल्हा परिषद अध्यक्षा आरती फुफाटे तसेच जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरत अवयवदानाबाबत सामान्यांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
रॅलीच्या शुभारंभाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ.अशोक राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.टी.जी. धोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डी.डी.भगत उपस्थित होते.
पोस्टल मैदान येथे सुरु झालेली ही रॅली मैदानाला वळसा घालत एलआयसी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, विश्रामभवन या मार्गाने फिरत रॅली वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रोतृगृहात विसर्जित झाली. शुभारंभाप्रसंगी आपले विचार व्यक्त करतांना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी मानवी अवयव निर्माण करता येत नाही. अवयवदानातूनच ते उपलब्ध होवू शकते. त्यामुळे यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
या रॅलीत वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह शहरातील विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अवयवदानाबाबत जनजागृती करणारे फलक हातात घेतले होते. काही चित्ररथांद्वारेही जनजागृती करण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर पथनाट्येही सादर केली. महाविद्यालयाच्या श्रोतृगृहात रॅलीचा समारोप झाला. समारोपाप्रसंगी अवयवदान जनजागृतीपर चित्रफीत दाखविण्यात आली.

00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी