शिवाजी विद्यालयात आरोग्य तपासणी, तंबाखूविरोधी मार्गदर्शन  
यवतमाळ, दि. 11  : राष्ट्रीय बाल स्वास्थ अभियान आणि राष्ट्रीय नियंत्रण कार्यक्रमातर्फे  शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी, दि. 8 ऑगस्ट रोजी विशेष आरोग्य तपासणी आणि तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्‍परिणामाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य  तपासणी करून चित्रपट आणि चित्रफितीच्या माध्यमातुन तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत माहिती देण्यात आली. तंबाखूमुळे मानवी शरीरावर होणारे हानीकारक परिणाम यावर प्रकाश टाकत तंबाखू व्यतिरिक्त जीवन जगता येते हे पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रम समुपदेशक मोहित पोहेकर यांनी चित्रफितीच्या माध्यमातून तंबाखूचे दुष्परिणाम स्पष्ट केले. तंबाखू सेवनामुळे होत असलेली जिवीत हानीची आकडेवारी विद्यार्थ्यांना समोर मांडून तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या विविध आजाराविषयी माहिती देऊन तंबाखूचे व्यसन सोडविण्यावर भर दिला.
राष्ट्रीय बाल स्वास्थ अभियानाचे डॉ. भोयर आणि डॉ. सोमण यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या आरोग्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी सागर परोपटे, मुख्याध्यापक एम. टी. बाबळे यांनी पुढाकार घेतला.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी