ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात सुट्टी
यवतमाळ, दि. 20 : जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूका दि. 24 ऑगस्ट रोजी होत आहे. या दिवशी निवडणुकीच्या क्षेत्रापुरती मतदानाकरिता स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
माहे सप्टेंबर ते डिसेंबर 2016 मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तथा पोटनिवडणुकीसाठी बुधवार दि. 24 ऑगस्ट रोजी सदर निवडणुका होत आहे. यादिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सार्वत्रिक व पोटनिवडणूक असलेल्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी