मुद्रा बँक योजनेचे बँकांना लक्ष्य देणार
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
*विमा योजनेच्या माहितीसाठी विशेष मेळावे
*सुलभरित्या कर्ज उपलब्ध करून देणार
*शेतीच्या विकासासाठी कर्ज देणार
यवतमाळ, दि.24 : युवा उद्योजक घडविण्यासाठी केंद्र शासनातर्फे मुद्रा बँक योजनेतून विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. बँका आपल्या परीने कार्य करीत असल्या तरी यात सुसूत्रता आणणे गरजेचे आहे.यासाठी बँकांना कर्जवाटपाचे किमान लक्ष्य देण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.ते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी डी.टी.राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.एस.मुद्दमवार, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री.राठोड, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहायक संचालक प्रांजली बारस्कर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत देशपांडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.सिंह म्हणाले, मुद्रा बँक योजनेतून दहा हजार ते दहा लाख रूपयांपर्यंत कर्ज मिळण्यासाठी तीन गट पाडण्यात आले आहे.त्यामुळे लहानात लहान गटाला कर्ज मिळण्याची सोय झाली आहे.मुद्रा योजनेच्या प्रचार-प्रसारामुळे अनेक तरूण बँकांमध्ये याबाबत माहिती घेण्यासाठी येत असल्याने त्यांना योग्य माहिती पोहोचविण्यात यावी.त्यांच्याशी योग्य व्यवहार करावा, मुद्राचा लाभ मिळविण्यासाठी दलाल निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.असे प्रकार आढळून आल्यास संबंधित बँक व्यवस्थापकाला जबाबदार धरण्यात येईल.मुद्राचे कर्ज देत असताना अर्जाची संख्या मोठी असल्यास त्या गावाची गरज आणि त्याची कर्ज परतफेडीची सक्षमता लक्षात घ्यावी.मुद्रासह शासनाच्या इतर अनुदान योजनांमध्ये बँकांचा सहभाग गरजेचा आहे.बँकांच्या सहभागाशिवाय या योजना यशस्वी होणार नाही.ज्या व्यक्तीला खरोखर आवश्यकता आहे, अशा अर्जांचा विचार प्रामुख्याने करावा.
शासनाने कृषितेर उद्देशासाठीही कर्ज देण्याची सुविधा आहे.शेताचे कुंपन, भाजीपाला लागवड, मत्सव्यवसाय, फुलशेती, ट्रॅक्टर, सिंचन, शेतीउपयोगी औजारेसाठीही कर्ज देता येणार आहे.यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदतच होणार आहे.त्यामुळे सर्व बँकांनी कर्ज वाटप करताना या बाबींचा विचार करावा.यासाठी आवश्यकता भासल्यास कार्यशाळा आयोजित करून याबाबत माहिती द्यावी.प्रत्येक बँकेला महिन्यातून एक शिबिर घेणे आवश्यक आहे.या शिबिरातून विमा योजना, पेन्शन योजना यांचीही माहिती देऊन त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे, असे श्री.सिंह यांनी सांगितले.
विमा योजनेत सहभाग वाढविणार
            केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरीकांच्या सुरक्षेसाठी केवळ 12 रूपयांमध्ये एक वर्षासाठी विमा योजना गेल्या वर्षीपासून सुरू केली आहे.अद्यापही अनेक नागरीक या योजनेत सहभागी झालेले नाहीत. त्यांना माहिती देऊन यात सामावून घेण्यासाठी मोहिम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेंतर्गत नागरीकांपर्यंत पोहोचून त्यांना विम्याचा लाभ देण्यात येणार आहे.जनधन योजनेंतर्गत खात्यामध्ये काही रक्कम ठेऊन त्यातून येणाऱ्या व्याजातून या विमा योजनेचा लाभ देण्याचा पर्याय नागरीकांना देण्यात येणार आहे.तसेच या योजनेच्या प्रचार आणि प्रसिद्धीवरही भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी