लोकअदालतीमध्ये 97 लाखांचे दावे निकाली
यवतमाळ, दि. 19 : जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 96 कोटी 90 लाख लाख रूपयांची 91 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. शनिवारी, दि. 13 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात लोकअदालत आयोजित करण्यात आली होती.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय तसेच राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. आर. शिरासाव यांच्या मार्गदर्शनानुसार प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. या लोकअदालतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपसी तडजोडीने मिटविण्यासाठी न्यायधीश, वकील, बँकांचे प्रतिनिधी, पक्षकारांना लोकअदालतीचे महत्त्व पटवून देण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात बँकांची 31 प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली.  याचे मुल्य 43 लाख 16 हजार 504 रूपये एवढे आहे. तसेच निगोशिएबल इंस्टुमेंट ॲक्टच्या कलम 138 नुसार 60 प्रकरणे 53 लाख 73 हजार 928 एवढे आहे.
लोकअदालतीसाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. आर. शिरासाव, दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर सचिन आगरकर यांनी पुढाकार घेतला.
00000



Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी