शिष्यवृत्तीसाठी आधार बँक खात्याशी जोडावे
*समाज कल्याण विभागाचे आवाहन
            यवतमाळ, दि. 25 : शासनातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जोडावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
            सामाजिक न्याय व‍ विशेष सहाय्य विभागातर्फे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसाय करणारे पालकांच्या पाल्यांसाठी अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येते. ही शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना आता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करावा.
            शाळेने विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची खात्री पटविण्यासाठी आधार कार्डची प्रत प्रस्तावासोबत जोडावी, बँक खात्याच्या क्रमांकाची खात्री पटविण्यासाठी पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी, आधार संलग्न केल्याचा पुरावा म्हणून संलग्नता (सिडींग) पावती सोबत जोडावी, याबाबत खात्री करून विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाणार आहे. याची सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी नोंद घेऊन आधार क्रमांक बँक खात्याशी जोडावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी