वडगाव तांडा येथील 59 कुटुंबांना एलपीजी गॅसचे वितरण
यवतमाळ, दि. 13 : जळावू लाकडासाठी वनांवर अवलंबून असलेल्या गावातील नागरीकांना संयुक्त वन व्यवस्थापन समितीतर्फे एलपीजी गॅसचे वाटप करण्यात येते. त्यानुसार दिग्रस तालुक्यातील वडगाव तांडा येथील 59 कुटुंबांना एलपीजी गॅसचे वितरण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. दिग्रस येथील प्रशासकीय इमातीत आज हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी पुसदचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मोहन जोशी, दिग्रसचे तहसिलदार किशोर बागडे, गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत, सहायक गटविकास अधिकारी अमित राठोड, वन परिक्षेत्र अधिकारी आनंद धोत्रे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राठोड यांनी शासनाच्या योजनेप्रमाणे वनक्षेत्रातील गावांमधील नागरीकांचे जळावू लाकडासाठी वनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीतर्फे गॅसचे वाटप करण्यात येत आहे. याचा फायदा प्रामुख्याने गृहिणींना होणार आहे. शासनाच्या योजनेतून 75 टक्के सबसिडीवर हे वाटप करण्यात येत आहे. याचा योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांपर्यंत पोहोचवावे, टप्प्या टप्प्याने याचा लाभ जिल्ह्यात देण्यात येणार आहे. यासाठी वन विभागाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
जन आणि वन हे राष्ट्राचे धन असून वनांचया संवर्धनातून विकास साधण्यासाठी धोरणात्मक निर्णय शासनाने घेतले आहे. या योजनांचा लाभ घेऊन जन आणि जमिनीचा विकास साधवा. जलतनासाठी जंगलतोड झाल्यास भविष्यात भीषण पर्यावरण हानीस समोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जगंलतोड होणार नाही, यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वत:चे कर्तव्य मानून जंगल वाचवावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी