रेती घाटांवर विनापरवानगी प्रवेशास बंदी
            यवतमाळ, दि. 25 : जिल्ह्यातील रेती घाटांची मुदत संपुष्टात आली आहे, तसेच 70 रेतीघाटांचा लिलाव झालेला नाही. या रेतीघाटांवरील रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूकीवर प्रतिबंध घालण्यासाठी या घाटांवर विनापरवानगी प्रवेश करण्यास 12 ऑगस्टपासून 30 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
            जिल्ह्यातील पैनगंगा, वर्धा, बेंबळा, अरूणावती, निर्गुडा, वाघाडी, खुनी, विदर्भ इत्यादी नदीनाला पात्रांमधील रेतीघाटांचे लिलाव झाले नाही. या घाटांवरील अवैध रेती उत्खननाचे प्रकार निदर्शनास येत आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नदी, नालेपात्रात ट्रक, ट्रॅक्टर, टिप्पर आदी वाहनांना रेती, वाळूचे अवैध उत्खनन, वाहतूक करण्यावर यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे.
            लिलाव झाले नसलेल्या रेतीघाटामध्ये बाभूळगाव तालुक्यातील वाटखेड बु., वाटखेड खु., मुबारकपूर, भैयापूर, दारव्हा तालुक्यातील करमाळा, निंभा ई., उमरखेड तालुक्यातील चिंचोली संगम, तिवडी, गुरफली, लोहारा खु., महागाव तालुक्यातील करंजखेड, राळेगाव तालुक्यातील आष्टा, झुल्लर, रोहणी, हिरापूर, रामतीर्थ, कळंब तालुक्यातील औरंगपूर, बऱ्हाणपूर, सातेफळ, हिवरादारणे, घाटंजी तालुकयातील निंबर्डा, डांगरगाव, चिंचोली, झरीजामणी तालुक्यातील डोर्ली, वणी तालुक्यातील भुरकी, रांगणा, बेलोरा, शिरपूर, सावरला, सुर्जापूर वारगाव, केळापूर तालुक्यातील कवठा, पिंपळखुटी, अर्ली या गावांचा समावेश आहे.
            जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार या ठिकाणी विनापरवानगी वाहनास प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. तसे आदेश नुकतेच जारी केले आहे. या घाटांवरून अवैध उत्खनन, वाहतूक व साठवणूक होणार नाही यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तालुका दंडाधिकारी यांनी दक्षता घ्यावी, असे सुचित केले आहे. उत्खनन, वाहतून किंवा साठवणूक आढळल्यास संबंधित वाहनचालक, मालक यांच्याविरुद्ध भादंवि 379, 188 आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 48 (7) व (8) नुसार कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी