मतदारयाद्या शुद्धीकरणासाठी रविवारी विशेष मोहिम
यवतमाळ, दि. 12 : मतदारयाद्या शुद्धीकरणाच्या कार्यक्रमानुसार यवतमाळ विधानसभा मतदारसंघाच्या सर्व केंद्रावर रविवारी, दि. 14 ऑगस्ट रोजी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या दिवशी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडीमध्ये उपस्थित राहतील.
मतदारांनी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन आपले नाव मतदारयादीत असल्याची खात्री करावी, ज्यांची नावे नाहीत, त्यांनी आपली नावे समाविष्ठ करण्यासाठी नमूना 6 भरून द्यावे, तसेच मतदारयादीतील नावासमोर फोटो नसलेल्यांनी तीन दिवसांच्या आत आपले यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक नमूना आठ चा अर्ज सादर करावा, असे आवाहन यवतमाळचे तहसिलदार सचिन शेजाळ आणि नायब तहसिलदार शरद सराफ यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी