माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र
यवतमाळ, दि. 11 : माझी कन्या भाग्यश्री या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना दि. 15 ऑगस्ट रोजी मुख्य ध्वजारोहण प्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर सदर प्रमाणपत्र वितरीत केले जातील. दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील खुशी शेख या मुलीची आई सलमा शेख रमजान शेख, समृद्धी या मुलीची आई वेदांती प्रविण राऊत, नेर तालुक्यातील मांगूळ येथील स्वरा या मुलीची आई सपना राजकुमार नंदागवळी, कळंब तालुक्यातील पहूर येथील पायल या मुलीची आई प्रणाली पंडीत खंडाळकर या महिलांना प्रमाणपत्र दिले जातील.
यवतमाळ तालुक्यातील भारी येथील वैभवी या मुलीची आई सारीका मंगेश गुरनुले, दारव्हा तालुक्यातील वारज येथील बाली या मुलीची आई सुनिता निलेश अगलधरे, तसेच दारव्हा तालुक्यातील बोरी येथील नंदीनी या मुलीची आई अर्चना संदीप गायकवाड या महिला लाभार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी