सद्‌भावना पंधरवाड्यानिमित्त बुधवारी सर्वधर्म प्रार्थना सभा
यवतमाळ, दि. 22 : सद्भावना पंधरवाड्यानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी, दि. 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व धर्म प्रार्थना सभेचे आयोजित करण्यात आली आहे.
20 ऑगस्ट हा सद्भावना दिवस, तर दिनांक 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान सामाजिक ऐक्य पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. अनेक धर्माच्या आणि अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना वृध्दींगत करणे आणि हिंसाचार टाळणे हा या मागील उद्देश आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये सामाजिक ऐक्य आणि सौहार्द भाव टिकविण्यासाठी मते मांडण्यास आमंत्रित केल्या जाईल. या क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रतिनिधींकडून प्रस्तावही स्विकारले जातील. प्रस्ताव दिनांक 23 ऑगस्टपर्यंत सादर करावयाचे आहे. यातून प्रत्येकी एका धर्मातील प्रतिनिधींची निवड केली जाणार आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी