पुसद प्रकल्प कार्यालयाकडून अर्ज आमंत्रित
यवतमाळ, दि 16 : पुसद येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी कार्यालयातर्फे विद्यार्थ्यांना संगणक अभ्यासक्रमावर आधारीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक संस्थांकडून दि. 26 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे.
प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय आदिवासी आश्रमशाळा हर्षी, वसंतपूर, खैरखेडा, पाळोदी, कोरटा, वडगाव शिंदे, पुसद येथील इयत्ता 5 ते 12 वी च्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विहित केलेल्या संगणक अभ्यासक्रमावर आधारीत प्रशिक्षण द्यावयाचे आहे. संगणक प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या संस्थेस प्रशिक्षणाचा किमान 5 वर्षात अनुभव असावा, वर्षभरामध्ये 9 महिन्याचे प्रशिक्षण ग्राह्य धरण्यात येईल, प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य, पुस्तके, सॉफ्टवेअर इत्यादी सदर संस्थेस उपलब्ध करुन द्यावे लागेल. 50 हजार रुपयाचे बँक गॅरंटी किंवा ठेव, बचतपत्र हमी म्हणून अपर आयुक्त, आदिवासी विभाग, अमरावती यांच्याकडे ठेवावी लागेल. संस्थेस मागील तीन वर्षांचे लेखा परिक्षण अहवाल जोडणे आवश्यक आहे. 10 संगणक संच उपलब्ध करुन द्यावे लागतील, तसेच संस्था नोंदणीकृत व एमकेसीएल शासनमान्य असावी, असे पुसद येथील प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी