जिल्हा आपत्ती व्यवस्थापनतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम
यवतमाळ, दि. 22 : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरण अंतर्गत एनडीआरएफ (NDRF) तळेगांव, पुणेतर्फे आपत्ती व्यवस्थापन जनजागृती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण आणि रंगीत तालीम (Mock Drill)  दि. 16 ते 30 ऑगस्ट पर्यंत घेण्यात येत आहे.
प्रशिक्षण उपविभागस्तर, तहसिलस्तरावर घेण्यात येत आहे. तसेच 29 तारखेला राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी प्रशिक्षण घेण्याकरिता 25 व्यक्तींची NDRF पुणे येथील चमू आली आहे. पूर परिस्थितीपासून बचाव, पूर विमोचन, बोट चालविण्याचे प्रात्याक्षिक, उपलब्ध संसाधनातून पूर परिस्थितीपासून करावयाचा बचाव, पूर परिस्थिती तसेच सर्पदंश, आग या आपत्तीत करावयाची पद्धती या विषयावर प्रशिक्षण आणि त्यांचे प्रत्याक्षिक व रंगीत तालीम घेण्यात येत आहे.
या प्रशिक्षणाकरिता प्रत्येक उपविभाग आणि तहसिलस्तरावर आपत्ती व्यवस्थापन समिती, तालुका स्तरावरील शोध आणि बचाव पथक, तालुकास्तरावरील अधिकारी आणि प्रत्येक  कार्यालयातील 2 कर्मचारी नगर परिषद मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका पशूवैद्याकीय अधिकारी, अभियंता बांधकाम विभाग, अभियंता पाणी पुरवठा विभाग, तालुका होमगार्ड समादेशक, अभियंता दूरसंचार निगम, अभियंता विद्युत विभाग, ठाणेदार, उपअधिक्षक भूमी अभीलेख, कृषी उत्पन्न बाजार समिती, सेवाभावी संस्थाचे प्रतिनिधी, प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी, राष्ट्रीय सेवा योजनेचे तालुका समन्वयक मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, नर्सेस आदी सर्व प्रत्येक तहसिलनिहाय 200 असे जिल्ह्यातील एकूण 2 हजार 200 व्यक्तींना प्रशिक्षण, प्रात्याक्षिक रंगीत तालीम देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाकरीता जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी नियोजन केले आहे.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी