उत्पादनशुल्कच्या छाप्यात 1 लाखाचा मुद्देमाल जप्त
*15 गुन्ह्यांची नोंद, आठ आरोपींना अटक
यवतमाळ, दि. 30 : राज्य उत्पादन शुल्कच्या यवतमाळ विभागाने सोमवारी अवैध दारूविक्रेत्यांविरूद्ध राबविलेल्या छाप्यात एक लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात 15 गुन्ह्यांची नोंद तर आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्‍क विभागाच्या आयुक्त व्ही. राधा यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर यांनी ही मोहिम राबविली. जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात छापे टाकून एक लाख 4 हजार 709 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात एका दुचाकीचा समावेश आहे. या मोहिमेत 2565 लिटर मोहफुलाचा सडवा जप्त करून नष्ट करण्यात आला. अवैध विक्रीबाबत राज्य उत्पादन शुल्कला मिळालेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत भारी शिवार, करडोह, वाघापूर, गोधणी, लोहारा, डेहणी, माणिकवाडा, किन्ही, कृष्णनगर, काळी दौलत, हुडी, मधुकरनगर, मोहदा, राळेगाव, रावेरीरोड, सिंघला, झरीजामणी, वणी, वरोरा रोड आदी गावांचा समावेश आहे. या कारवाईत निरीक्षक ए. बी. झाडे, यू. एन. शिरभाते, दुय्यम निरीक्षक एस. एन. भाटकर, सहायक दुय्यम निबंधक अविनाश पेंदोर, ए. बी. पवार, जवान व्ही. एस. वरठा, ए. ए. पठाण, एस. जी. धोटे, एन. डी. दहेलकर, एम. रामटेके, महेश खोब्रागडे, एस. दुधे, बी. मेश्राम, श्री. मसराम, राम पवार, श्री. मनवर, श्री. शेंडे, श्री. साठे, श्री. कुळसंगे यांनी सहभाग घेतला.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी