माजी सैनिक, पत्नी, पाल्‍यांसाठी विशेष गौरव पुरस्कार
यवतमाळ, दि. 31 : विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ठ कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कारप्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य आदी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कारप्राप्त, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ठ कामगिरी करणारे, पुर, जळीत, दरोडा, अपघात इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमुल्य कामगिरी करणारे माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यासाठी 10 हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 25 हजार रुपयाचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळून उत्तीर्ण होणाऱ्या माजी सैनिक, विधवांच्या पाच पाल्यांना विभागीय पातळीवर 10 हजार रुपयाचा विशेष गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. पात्र इच्छुकांनी आपले अर्ज संबंधित कागदपत्रांसह दिनांक 15 सप्टेंबर 2016 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यवतमाळ येथे पाठवावे. अधिक माहितीसाठी 07232-245273 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती