नागरीकांनी आता अवयवदानासाठी पुढे यावे
- डॉ. टी. जी. धोटे
यवतमाळ, दि. 25 : अवयवदानाच्या प्रतिक्षेत असंख्य नागरीक आहेत, त्यांना आवश्यक असलेला अवयव मिळाल्यास त्यांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे नागरीकांनी अवयवदानासाठी स्वत:हूनपणे पुढे यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने संपुर्ण राज्यात एकाच वेळी राज्य ते तालुकास्तरापर्यंत महाअवयवदान अभियान 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालयात दि. 20 ऑगस्ट 2016 रोजी डॉ. धोटे यांच्या अध्यक्षतेखाली अवयवदान महाअभियान संदर्भात सभा घेण्यात आली. या सभेमध्ये डॉ. धोटे यांनी अवयवदाना संदर्भात माहिती दिली.
डॉ. धोटे यांनी अवदान, अवयवदान प्रतिरोपन, कोणत्या अवयवाचे दान करावे, मस्तिस्क्‍ स्तंभ मृत्यू, मस्तिस्क्‍ स्तंभ मृत्युचे निदान. मस्तिस्क्‍ स्तंभ मृत अथवा ब्रेन डेथ व्यक्ती जगण्याची शक्यता, अवयवदानासाठी मृत्यू रुग्णालयात होणे गरजेचे आहे काय, मस्तिस्क्‍ स्तंभ मृत्यू घोषित करणे आणि अवयवदान कायदेशीर आहे काय, अवयवदानानंतर मस्तिस्क्‍ स्तंभ मृत व्यक्तीचे शरीर त्यांच्या नातेवाईकांना परत दिले जाणे, दान केलेल्या अवयवाचे विवरण कसे होते, ते फक्त श्रीमंत व्यक्तीलाच दिले जाते काय, मस्तिस्क्‍ स्तंभ मृत दात्याच्या नातेवाईकांना अवयव कोणाला दिले हे कळू शकते काय, अवयवदान केल्याने मस्तिस्क्‍ स्तंभ मृत दात्याच्या शरीरावर काही विदृपता येणे, अवयवदानाला धर्माची परवानगी, अवयवदान केल्यानंतर मस्तिस्क्‍ स्तंभ मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मोबदला, अवयवदान करायची इच्छा असल्यास काय करावे, याबाबत माहिती दिली.
डॉ. धोटे यांनी सर्वसामान्य जनतेला आवाहन करून अवयवदानाचे महत्त्व समजुन घेवुन, जनतेने अवयवदान करावे, तसेच ज्यांना अवयवदान करायचे आहे त्यांनी दि. 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, शासकीय जिल्हा रुगणालय, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय येथे संपर्क साधून जे अवयवदान करु इच्छितात त्यांनी फार्म नंबर 5 आणि देहदान करु इच्छिणाऱ्यांनी देहदान संदर्भात अर्ज भरुन द्यावा आणि डोनर अर्ज  प्राप्त करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या देशात अपघात आणि त्यातून मुत्यूचे प्रमाण जास्त असुनही अवयवदानाचे प्रमाण नगण्य आहे. अवयवदानाबदल जनजागृती नसल्याने ही जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये अवयदानाचे विचार मांडले. त्यांनी ‘तेन त्यक्तेन भुंजिथा’ म्हणजेच त्याग करण्याचा उत्तम आनंद असे या अवदानाचे महत्त्व सांगितले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी