अंशदायी निवृत्ती वेतन योजनेबाबत प्रशिक्षण
यवतमाळ, दि.24 :राष्ट्रीय अंशदायी निवृत्ती वेतन योजनेसंबंधी हैद्राबाद येथील NPS-NSDL तर्फे दि. 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत सर्व आहंरण आणि संवितरण अधिकारी, आस्थापना कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांकरिता प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेआहे.
हैद्राबाद येथीलअधिकाऱ्यांकडून राष्ट्रीय अंशदायी निवृत्ती वेतन योजनेसंबधी NPS- NSDL प्रशिक्षण देण्यात येणार आहे.आहंरण संवितरण अधिकारी, आस्थापना कर्मचारी यांनी या प्रशिक्षणास प्राधान्य द्यावे,प्रशिक्षणासाठी जिल्हा कोषागार आणि उपकोषागार कार्यालयाशीसंपर्क साधावा आणि त्यांनी सांगितलेल्या दिवशी गार्डन हॉल जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशिक्षणास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागाार अधिकारी यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी