नगरपालिकांच्या अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना प्रसिद्ध
यवतमाळ, दि. 16 : यवतमाळ जिल्ह्यात होऊ घातलेल्या आठ नगरपालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभागरचना जाहिर केली आहे. या प्रभागांचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा आणि सिमा प्रदर्शित केलेल्या अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना संबंधित नगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यवतमाळ, वणी, पुसद, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, आर्णी, घाटंजी येथील नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी संबंधित शहरांची विभागणी नवीन प्रभागामध्ये करण्यात आली आहे. त्यांचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा आणि सिमा नागरीकांना पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. या नगरपालिकांमधील निवडणुकीसाठी 20 जुलै रोजी सोडत पद्धतीने आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या नगरपालिकांमधील प्रारूप प्रभागांची रचना 5 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार 14 जुलैपर्यंत मतदारांकडून हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. यात यवतमाळ, 26, वणी 1, पुसद 12, उमरखेड 1, दारव्हा 2, आर्णी 3, घाटंजी 3 असे एकूण 48 आक्षेप प्राप्त झाले. याबाबत अभिप्राय सादर करून ते विभागीय आयुक्त यांच्याकडे अंतिम प्रभाग रचना मंजुरीकरीता प्रस्ताव सादर करण्यात आले. या प्रस्तावावर विभागीय आयुक्त यांनी यवतमाळ पालिकेमधील प्रभाग क्रमांक 21 मध्ये जोडण्यात आलेला यवतमाळ ग्रामीण मधील गट क्र. 13/2 हा भागप्रभाग क्र. 20 मध्ये जोडण्यात यावा, तसेच परिशिष्ट 3 ते 8 व नकाशामध्ये दुरूस्ती करण्यात यावी, या अटीवर यवतमाळ नगरपालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेस मान्यता दिली आहे. तसेच वणी, पुसद, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, आर्णी, घाटंजी येथील नगर पालिकच्या अंतिम प्रभाग रचना मंजुरीबाबत सादर करण्यात आलेले अभिप्राय व दुरूस्ती मान्य करून त्याच अंतिम मान्यता देण्यात आली.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी