राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत
यवतमाळ, दि. 30 : अनुसूचित जातीच्या नवबौद्धासह 100 विद्यार्थ्यांना सन 2016-17 या वर्षात देशातील नामांकीत शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, यासाठी अर्ज करावेत असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.
या शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी www.maharashtra.gov.in, www.sjsa.maharashtra.gov.in,  www.mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरून दि. 31 ऑगस्टपर्यंत आयुक्त, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सादर करावयाचा आहे. योजनेसंबंधी सर्व माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती