लोकसेवा आयोगाच्या परिक्षा केंद्रावर जमावबंदी
यवतमाळ, दि. 22 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे रविवार, दिनांक 28 ऑगस्ट रोजी राज्यसेवा कर सहाय्यक परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेदरम्यान अनुचित प्रकारांवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 जारी केले आहे.
या कलमातील तरतुदीनुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच परीक्षेच्या दिवशी परीक्षा चालु असतांना सकाळी 8 ते सायंकाळी 6 या कालावधीत परीक्षार्थी आणि परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करता येणार नाही, असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी