एचआयव्हीसह जगणाऱ्या बालकांना सकस आहाराचे वाटप
यवतमाळ, दि. 11 : येथील स्वामी विवेकानंद सेवा समितीतर्फे एचआयव्हीसह जगणाऱ्या बालकांना सकस आहाराचे वाटप आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. सोमवारी, दि. 8 ऑगस्ट रोजी रूईकरवाडी येथील रोटरी शताब्दी भवनात हा कार्यक्रम पार पडला.
हेल्थ प्रमोशन ट्रस्ट अंतर्गत जिल्ह्यात एचआयव्हीसह अनाथ बालकांना पोषक आहार, आरोग्य शिक्षण, सामाजिक संरक्षण आणि कल्याणकारी सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. बालकाना नियमित सकस आहार, प्रथिनेयुक्त अन्नाची नितांत आवश्यकता असल्यामुळे बालकांची ही गरज लक्षात घेता डीएपीसीयू–सीएबीए आणि विहान हे पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक विविध सामाजिक संस्था, क्लब, मंडळ, आदींच्या सहकार्याने कार्यक्रम घेतात. या पथकांतर्गत स्वामी विवेकानंद सेवा समितीच्या माध्यमातून बालकांना आहार वाटप आणि शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमाला समितीचे सदस्य निखील डेहनकर, प्रदिप मेंढे, विहानचे प्रकल्प समन्वयक हेमेंद्र राऊत उपस्थित होते. प्रफुल्ल उके सूत्रसंचालन केले.
एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या बालकाना सकस आहार वितरण करण्याची इच्छा असलेल्या संस्था, समिती, मंडळ, क्लब यांनी जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण पथक यवतमाळ यांच्याशी  07232-239515 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी