पंतप्रधानांनी साधला लाभार्थ्यांशी थेट संवाद




प्रधानमंत्री आवास योजना

v जिल्हाधिका-यांच्या हस्ते घरकूल प्रमाणपत्राचे वाटप
यवतमाळ, दि. 6 : प्रधानमंत्री आवास (शहरी व ग्रामीण) योजनेंतर्गत घरकूल मिळालेल्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीसीद्वारे आज (दि.5) संवाद साधला. जिल्ह्यातील उमरखेड नगर पालिका क्षेत्रातील 14 लाभार्थी तसेच विविध ग्रामीण भागातील 18 अशा एकूण 32 घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचा राष्ट्रीय सुचना केंद्रामध्ये हा संवाद घडून आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, नगर पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी, म्हाडाचे उपअभियंता डी.बी. साळूंके उपस्थित होते.
संपूर्ण देशातील लाभार्थ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, घर केवळ चार भिंतींनी उभे होत नाही. त्याला घरपण देण्याचे काम कुटुंबियांचे आहे. आपले घर स्वच्छ व चांगले ठेवणे गरजेचे आहे. मुलांना चांगले शिक्षण द्या. तसेच मुलींच्या शिक्षणावर व आरोग्यावर लक्ष द्या. पाण्याचा वापर काटकसरीने करा. व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करण्यासाठी व्यसनापासून दूर रहा, असे त्यांनी देशभरातील उपस्थितांना सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यात उमरखेड नगर पालिका क्षेत्रातील विशाल रावते, गंगासागर गोडे, वनिता जाधव, पूजा बारे, सपना चौधरी, ज्योती कोटगीरवार, दिलीप नंदनवार, ज्योती जिलेवार, उषा कामरकर, बंडू कुभरे, पूजा चेके, शंकर रावते, दीपक पोफळकर, आरती मलकेवार यांचा समावेश होता. तसेच यावेळी चिकणी (डो) येथील ललिता जगताप, इंद्रथाना येथील सुमन कुडावे, पाथ्रड येथील गोपाळ मेश्राम, अकोली येथील नंदा बेटकर, बिटरगाव येथील किशोर विनकरे, बिटरगाव (बु) रख्माबाई दसरवाड, वडगाव (पो) येथील ममता देठे, आकपूरी येथील सुमन पेंदोर आणि अनिता पुरके, उंदरानी येथील अश्विनी आत्राम व दिलीप ठाकरे, चांदापूर येथील राजू घारेकार, कोठा येथील लक्ष्मी तेलंग, मालनबी शेख, रेखा टेकाम, रोहडा येथील विठ्ठल नागूलकर, अरुण खिल्लारे आणि लोणी येथील समाधान चिरमाडे उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी