पालकमंत्र्यांनी घेतला विविध विषयांचा आढावा


यवतमाळ, दि. 18 : जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेतला. यात धडक सिंचन विहिर, पालकमंत्री पांदन रस्ते, कौशल्य विकास, खनीज निधी, कॅन्सर हॉस्पीटल आदींचा समावेश होता.
बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, खनीकर्म अधिकारी श्री. गोसावी, तहसीलदार सचिन शेजाळ आदी उपस्थित होते.
धडक सिंचन विहिरींचे जिल्ह्याला मिळालेले उद्दिष्ट प्राधान्याने पूर्ण करा, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, आधीच्या काळातील रद्द करण्यात आलेल्या 641 विहिरी, धडक मध्ये नव्याने समाविष्ट न झालेल्या देण्याचे नियोजन करावे. तसेच ज्या मंजूरीविना आहेत, त्यांना मंजूरी मिळाल्यानंतर पाणलोट क्षेत्रानुसार पूर्ण करण्यात येईल. गावखेड्यात पांदन रस्ते ही महत्वाची गरज आहे. पालकमंत्री पांदन रस्त्यांबाबत जिल्हाभर मोहीम राबविण्यात येत आहे. यवतमाळ तालुक्यात आतापर्यंत 116 पांदन रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. रस्ते मोकळे करण्यासाठी ग्रामसभेची मंजूरी घेऊन संबंधित समित्यांच्या त्वरीत बैठका घ्याव्यात. प्रत्यक्ष बाधीत क्षेत्रातील तसेच अकोलाबाजार येथील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राबाबतचा प्रस्ताव त्वरीत पाठवावा.  येथे साकारण्यात येणारे कौशल्यभवन हे पीपीपी तत्वावर उभारण्यात येणार असून होस्टेल, प्रशिक्षण आदी सुविधा येथे राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी संदीप महाजन यांनी जिल्ह्यात मंजूर झालेल्या 4 हजार 159 विहिरींपैकी 672 विहिरी पूर्ण झाल्या असून 1910 विहिरी प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी