वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाकरीता ९१ टक्केस जमीन संपादीत


भू-धारकांना ३३८ कोंटींचे वाटप
            यवतमाळ, दि. २८ : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी जिल्‍हयातील १०३८.१८ हेक्‍टर जमीन संपादित करण्‍यात आली आहे. ही टक्केवारी 91 असून  लवकरच संपूर्ण जमीन संपादित केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्यामिनीचा मोबदला म्हणून भू-धारकांना ३३८ कोटी 33 लाख रूपयांचे वाटप करण्‍यात आले आहे.
            या रेल्‍वे प्रकल्‍पातील पहिला टप्‍पा वर्धा ते यवतमाळ मार्गावरील जमीन संपादीत करण्‍याचा आहे. हा टप्‍पा पूर्ण करण्‍यात आला आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्‍प जवळपास ३ हजार १६८ कोटी रूपयांचा असून यवतमाळ पर्यंतची संपूर्ण जमीन रेल्‍वे विभागाला हस्‍तांतरीत करण्‍यात आली आहे. पुढील जमीन हस्‍तांतरीत करण्‍याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.  
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, यवतमाळ, दारव्‍हा, पुसद, दिग्रस, उमरखेड या सहा तालुक्यातील एकूण ११४४ हेक्टर ८५ आर जमीन संपादित करण्‍यात येणार आहे. यापैकी १०४३.१८ हेक्‍टर म्‍हणेजच ९१ टक्‍के जमीन संपादीत करण्‍यात आली आहे. यवतमाळ जिल्‍हयात या रेल्‍वे मार्गाची लांबी १८४ किलोमिटर आहे. सदर मार्ग ९५ गावांमधून जाणार असल्‍याने शहरास‍ह ग्रामीण परिसराच्या विकासासाठी रेल्वेचे फार मोठे योगदान लाभणार आहे. या रेल्वे मार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. व्यापारासोबतच शिक्षण व अन्य क्षेत्रातील विकासालाही हा मार्ग मैलाचा दगड ठरणार आहे. जिल्‍हयातील भू-संपादनाचे काम बहुतांश पूर्ण झाल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने आपले काम त्वरीत सुरू करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 
जिल्ह्याच्या विकासाचा मानबिंदू ठरणार
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग हा यवतमाळ जिल्‍हयातील शेतकरी, व्‍यापारी, लहान-मोठे  व्‍यावसायिक यासोबतच शिक्षण व आदी बाबींसाठी महत्वाचा ठरणार आहे.  जिल्ह्यात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. तसेच उद्योगांना अनुकूल वातावरण असून रेल्वेमुळे उद्योग व्यवसायामध्ये भरभराटी निर्माण होईल.
तालुका
गावांची संख्‍या
एकूण क्षेत्र(हेक्‍टर आरमध्‍ये)
संपादित क्षेत्र  (हे.आरमध्‍ये ) 
टक्‍केवारी
यवतमाळ
15
219.69
219.69
100
कळंब
12
216.47
216.47
100
दारव्‍हा
21
192.72
173.38
89.96
पुसद       
18
285.77
239.30
83.73
दिग्रस
13
191.10
191.10
100
उमरखेड
16
139.10
110.20
74.4
एकूण
95
1144.85
1043.18
91

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी