प्रत्ये क गावासाठी ‘कर्जवाटप पालक अधिकारी’ - जिल्हाकधिकारी डॉ. राजेश देशमुख



v कुठलाच पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये
यवतमाळ, दि. 28 : खरीप हंगामाला सुरुवात झाली असून जिल्ह्यात मान्सूनचेसुध्दा आगमन झाले आहे. शेतीच्या या हंगामात जिल्‍हयातील कुठलाच पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, यासाठी आता गावनिहाय कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक यांची कर्जवाटप पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्‍यात आली आहे. गावातील कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी शेतक-यांना कर्ज उपलब्ध करून देण्यास मदत करावी. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, असे आदेश डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधितांना दिले आहे.    
शेतक-यांची पेरणीची लगबग सुरू झालेली आहे. अशावेळी शेतक-यांना बॅंकांकडून तातडीने कर्ज पुरवठा व्‍हावा, यासाठी बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्‍हयातील बॅंकांच्‍या शाखा स्‍तरावर अर्ज द्या, कर्ज घ्‍यामेळाव्‍याचे आयोजन  करण्यात आले होते. सदर मेळावे 20, 26 व 27  मे रोजी तसेच 20  जून रोजी  घेण्यात आले. मात्र तरीसुध्दा अनेक पात्र शेतकरी खरीप पीक कर्जापासून वंचिआहेत. अशा शेतक-यांना कर्ज मिळवून देण्यासाठी ग्रामस्‍तरावर नेमून दिलेले कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक ‘कर्जवाटप पालक अधिकारी’ म्‍हणून कर्ज मिळण्यासाठी मदत करतील. नव्हे तर पात्र शेतक-यांना बॅंकेकडून कर्ज मिळवून देण्‍याची जबाबदारी त्यांना पार पाडावयाची आहे. नियुक्‍त केलेल्‍या पालक अधिका-यांनी दत्‍तक गावातील शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्‍यावी. तसेच शेतक-यांच्‍या पीक कर्जासंबंधीच्‍या अडचणी सोडविण्‍यासाठी संबंधित बॅंकेशी संपर्क साधून त्‍या गावातील शेतक-यांना पीक कर्ज मिळवून द्यावे, असे आदेश देण्‍यात आले आहे.   
ग्रामस्‍तवरील पालक अधिका-यांवर गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार, सहायक गटविकास अधिकारी, विस्‍तार अधिकारी, तालुका मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांची पर्यवेक्षक अधिकारी म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात आली. त्यांनी  जिल्‍हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना अभियान कक्षात पीक कर्ज वितरणाचा अहवाल दररोज सादर करण्‍याचे आदेश जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे.
तसेच शेतक-यांना काही अडचण आल्‍यास बळीराजा चेतना अभियान 07232-244100 आणि जिल्‍हा अग्रणी बॅंक व्‍यवस्‍थापक 7507766003 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात आले.
                                               00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी