20 जून रोजी ‘अर्ज द्या, कर्ज घ्याा’ मेळावा


यवतमाळ, दि. 18 : खरीप हंगामाला सुरवात झाली असून शेतक-यांची पेरणीची लगबग सुरू झालेली आहे. अशावेळी शेतक-यांना बॅंकांकडून तातडीने कर्ज पुरवठा व्‍हावा, यासाठी बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्‍हयातील 239 बॅंकांच्‍या शाखा स्‍तरावर अर्ज द्या, कर्ज घ्‍यामेळाव्‍याचे आयोजन 20 जून रोजी  करण्‍यात आले आहे. या कर्ज मेळाव्‍याचा लाभ शेतक-यांनी घ्‍यावा, असे  आवाहन कै. वसंतराव नाईक शेती स्‍वावलंबन मिशनचे अध्‍यक्ष किशोर तिवारी आणि जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
             खरीप हंगामा शेतक-यांना वेळीच कर्जपुरवठा झाला नाही तर शेतकरी आपल्‍या शेतामध्‍ये पेरणी करू शकणार नाही. त्‍यामुळे शेतक-यांची कर्जासाठी होणारी पायपीट थांबविण्‍यासाठी, त्‍यांना एकाच छताखाली सुलभरित्‍या कर्ज उपलब्‍ध व्‍हावे, यासाठी मेळावाचे आयोजन करण्‍यात आले आहे. गावातील जे शेतकरी कर्ज मिळण्‍यापासून वंचित राहिलेले आहे, अशा शेतक-यांनी या मेळाव्‍यात कर्ज पुरवठा मिळण्‍यासाठी अर्ज सादर करावेत.
 प्रत्‍येक बॅंकांच्‍या शाखांकरीता एक संपर्क अधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असून त्‍या भागातील शेतक-यांना कर्ज पूरवठा सुरळीत करण्‍याची जबाबदारी त्‍यांच्‍यावर राहणार आहे. तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक यांनी आपल्‍या गावामध्‍ये या मेळाव्‍याची माहिती शेतक-यांपर्यंत पोहचून शेतक-यांना कर्ज मिळवून देण्‍यासाठी पुढाकार घ्‍यावा. शेतक-यांना कुठल्‍याही प्रकारची अडचण आल्‍यास बळीराजा चेतना अभियान 07232-244100 आणि जिल्‍हा अग्रणी बॅंक व्‍यवस्‍थापक 7507766003 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन कै. वसंतराव नाईक शेती स्‍वावलंबन मिशनचे अध्‍यक्ष किशोर तिवारी आणि  जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी