पोलीस दलात एका क्लिकवर माहितीची देवाणघेवाण



* डिजीटायझेनकडे यवतमाळ पोलीस दलाची वाटचाल
यवतमाळ दि.28 : पोलीस दलाचा व्याप हा सर्वश्रुत आहे. सण, उत्सव, निवडणूक, व्हीआयपी दौरे यात पोलीस दल आपल्याला नेहमी कडा पहारा देताना दिसून येतात. याव्यतिरिक्त जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणे, गुन्हेगारांना जेरबंद करणे, गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, गुन्हेगारांना सजा मिळवून तक्रारदारांना न्याय मिळून देणे, यात पोलीस दल हे रात्रं दिवस मेहनत घेत राहतात. याशिवाय पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना गुन्हे परिषद, उजळणी कोर्स, कार्यशाळा व कार्यालयीन कामाकरीता वरिष्ठ कार्यालयात सुध्दा वारंवार हजेरी लावावी लागते.
या सर्व बाबींचा विचार करून वरिष्ठ कार्यालयात पोलीस कर्मचारी व अधिका री यांची वारी कशी कमी करता येईल व त्यांच्यापर्यंत वरिष्ठांनाच कमी वेळात कसे पोहोचता येईल, यावर जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक यांनी उपाय शोधून काढला तो उपाय म्हणजे व्हिडीओ कॉन्फरन्सी.  सक्षम निरीक्षण क्षमता व आपल्या दलाकरीता नेहमी काहीतरी नवीन नवीन कल्पक योजनाद्वारे पोलीस दलाचा ताण कमी कसा करता येईल, याचा ध्यास असलेले जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सी ही पोलीस दलाला परीचित करून दिली.
हैद्राबाद अभ्यास दौऱ्यावर असताना अपर पोलीस अधीक्षकांनी एका आस्थापनेवर ही व्हिडीओ कॉन्फरन्सी सुरु असल्याचे पाहिले व तेव्हाच त्यांनी त्याची इतंभुत माहिती गोळा करून त्याची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यात करण्याकरीता प्रयत्न सुरु केले. वारंवार जिल्हाधिकारी कार्यालय येथील माहिती तंत्रज्ञान कार्यालय व एनआयसी कार्यालय येथे स्वत: फोनद्वारे संपर्कात राहून त्यांनी कोणताही खर्च न करता केवळ आपल्या मोबाईल फोनवर ही कार्यप्रणाली सुरु केली. त्यांच्या या प्रयत्नामुळेच आज एका क्लिकवर सर्व दल एका वेळेस वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत माहितीची देवाण घेवाण करू शकतात. नुकतीच अपर पोलीस अधीक्षक यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे गुन्हे आढावा बैठक आयोजित केली. नेहमी वरिष्ठ कार्यालयात होणाऱ्या या गुन्हे बैठकीकरीता केवळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे उपस्थित राहत होते. त्यांच्याद्वारे पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यांचा आढावा घेण्यात येत होता व वरिष्ठाकडून मिळणाऱ्या सुचना हे प्रभारी अधिकारी आपल्या पोलीस स्टेशन येथे कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचते करीत होते. परंतु पहिल्यांदा व्हिडीओ कॉन्फरन्सी द्वारे घेण्यात आलेल्या गुन्हे बैठकीला जिल्ह्यातील प्रत्येक तपासी अंमलदार हा प्रत्यक्ष हजर होता. आपल्याच पोलीस स्टेशनला हजर राहून त्यांच्याकडे असलेल्या गुन्ह्याकरीता वरिष्ठांकडून मिळणाऱ्या सुचना ग्रहन करीत होता. त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांची गुन्ह्यांबाबत असलेली कैफीयत ते सरळ वरिष्ठांसमक्ष मांडू शकत होते. डिजीलायझेनकडे टाकलेल्या पावलाचे समाधान पोलीस दलात पाहावयास मिळत आहे.
00000000





Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी