किशोर तिवारी यांनी घेतली आढावा बैठक




यवतमाळ दि. 17 : वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांबाबत आढावा बैठक घेतली, यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनिल महिंद्रीकर, उपवनसंरक्षक डॉ.भानुदास पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री. तिवारी म्हणाले, राज्य शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि गरीब व गरजू नागरिकांना स्वस्तात भोजन उपलब्ध व्हावे याकरीता शिवभोजन योजना सुरु केल्या आहेत. या दोन्ही योजना अतिशय महत्वकांक्षी असून अधिकाऱ्यांनी या योजनांची गांभिर्याने अंमलबजावणी करावी. आगामी हंगामात प्रत्येक शेतकऱ्याला पिक कर्ज उपलब्ध होण्यासाठी बँकांनी काळजीपूर्वक काम करावे. तसेच ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा वाढविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने लक्ष द्यावे. वनविभागाने नुकसानीचे पंचनामे त्वरीत करून मोबदला उपलब्ध करून द्यावा. बळीराजा चेतना अभियानामार्फत जमीनीतला ओलावा टिकविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. शासनाची प्रतिमा मलिन होणार नाही याकडे अधिकाऱ्यांनी गांभिर्याने लक्ष देवून कामाचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या, यावेळी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती