वनविभागाने एमटीडीसीच्या सहकार्याने निसर्ग पर्यटन विकासाचा बृहद आराखडा तयार करावा - वनमंत्री संजय राठोड



        यवतमाळ, दि.4 : महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने निसर्ग पर्यटन विकासाचा बृहद आराखडा तयार करावा, असे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले. वनविभागाच्या निसर्ग पर्यटन योजनेचा आढावा वनमंत्री. श्री. राठोड यांनी मंत्रालयात घेतला त्यावेळी ते बोलत होते.
        वनमंत्री श्री. राठोड  म्हणाले, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन महामंडळाचे बळकटीकरण करण्याची गरज आहे . त्यादृष्टीने या मंडळातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशा सूचना त्यांनी केल्या. निसर्ग पर्यटन स्थळांचा विकास झाल्यास त्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे त्यांनी सांगितले. वनक्षेत्राच्या आसपास राहणाऱ्या स्थानिकांमध्ये वनसंरक्षणबाबत जागृती निर्माण करावी तसेच या चळवळीत लोकसहभाग वाढवण्याचे निर्देशही श्री.राठोड यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पर्यटकांना सुविधा देणार
   श्री. राठोड पुढे म्हणाले, निसर्ग पर्यटनाचा विकास करण्याच्या दृष्टीने पर्यटकांना अधिकाधिक चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्याची गरज आहे. वनक्षेत्रातील रस्ते तसेच निवासाच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करावी, असे निर्देशही संजय राठोड यांनी दिले.
        यावेळी वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. रामबाबू, नितीन काकोडकर, पी.साईप्रकाश तसेच महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी