पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष घटक योजनेच्या चित्ररथाला हिरवी झेंडी





यवतमाळ दि.28 : सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जातींसाठी अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांची लोकांना माहिती व्हावी, या उद्देशाने सामाजिक न्याय विभाग व जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ यांच्यावतीने जिल्ह्यातील तालुक्यात चित्ररथाद्वारे प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे. या चित्ररथाला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी हिरवी झेंडी दाखवून आज (दि.28) रवाना केले.
जिल्हा क्रीडा संकूल येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, पोलिस अधिक्षक मेघनादन राजकुमार, अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त किशोर भोयर, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.
या चित्ररथामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर आधारीत ऑडीओ जिंगल्सद्वारे नागरिकांना योजनांची माहिती सांगण्यात येईल. तसेच योजनांची माहिती असलेली स्टीकरशीट व घडीपुस्तिकांचे नागरिकांना वाटप करण्यात येईल. या योजनांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहे, रमाई घरकुल योजना, अनुसुचित जाती व नवबौध्द मुला-मुलींसाठी निवासी शाळा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, मागेल त्याला प्रशिक्षण योजना, मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कन्यादान योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजना आदींचा समावेश आहे.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी