दारव्हा शासकीय धान्य गोदामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून आकस्मिक पाहणी धान्यवितरणात अनियमितता आढळल्यास कारवाईचे संकेत






यवतमाळ दि. 29, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी आज आपल्या व्यस्त दौऱ्यातून वेळ काढून दारव्हा येथील शासकीय धान्य गोदामाची आकस्मिक पाहणी केली. यावेळी त्यांचेसमवेत उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी हे देखील होते.
धान्य वाहतुकीची जीपीएस ट्रॅकिंग होते का, वाहतूक पास ची नोंद घेतली जाते का, साखर किती आली, गहू, तांदूळ कधी आले, त्याची प्रतवारी काय आहे, असे संबंधीत अधिकारी/कर्मचारी यांना प्रश्न विचारून धान्यगोदामात सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेतली.
यावेळी त्यांनी धान्यसाठा किती आहे, धान्याचे वितरण कसे केले, किती धान्य वाटपसाठी पाठवले याबाबत नोंदवह्यांची तपासणी केली. धान्य वाटप मध्ये तक्रार आल्यास कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी संबंधीतांना बजावले.
धान्यगोदामाच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करताना आग लागल्यास काय व्यवस्था आहे याची जिल्हाधिकारी सिंह यांनी पाहणी केली. यावेळी तेथील आगरोधक यंत्राद्वारे फवारणी करून प्रात्यक्षिक करून घेतले.
तत्पुर्वी जिल्हाधिकारी सिंह यांनी दारव्हा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, तहसिल कार्यालय येथे देखील भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी यांनी कार्यालयातील प्रत्येक कक्षात जाऊन तेथील कामकाज व्यवस्थाचे पाहणी केली. यावेळी त्यांनी अभिलेख कक्ष अद्यावत ठेवण्याचे तसेच कार्यालयीन परिसरात स्वच्छता ठेवण्याविषयी संबंधीतांना निर्देशित केले.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी