शेतकरी कर्जमुक्ती : जिल्ह्यात डाटा अपलोडचे 95 टक्के काम पुर्ण




यवतमाळ दि.17, महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बँकांची महत्वपुर्ण भूमिका असून जिल्ह्यातील बँकेमार्फत शेतकऱ्यांचा डाटा अपलोडींगचे कामे सकारात्मक आहेत, मात्र प्रलंबित कामे पुढील तीन दिवसात तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी सुनिल महिंद्रीकर यांनी बँकर्सच्या बैठकीत बँक प्रतिनिधीना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज शेतकरी कर्जमाफी संबंधात बँकेकडून झालेल्या कामाचा आढावा अपर जिल्हाधिकारी महिंद्रीकर यांनी घेतला. यावेळी जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, अग्रणी बँकेचे जिल्हा उपप्रबंधक सचिन नारायणे तसेच सेंट्रल बॅक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, आयडीबीआय बँक,युको बँक, सिंडीकेट बँक, कॅनरा बँक व विविध बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कर्जमाफीसाठी पथदर्शी कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातून राळेगाव व दिग्रस या दोन गावातील शेतकऱ्यांच्या याद्या सर्वप्रथम प्रसिद्ध करण्यात येणार आहे तेव्हा कामाची गती वाढविण्याबाबतही अपर जिल्हाधिकारी महिंद्रीकर यांनी बँकर्सना सुचित केले.
जिल्ह्यातील 1,07,971 पात्र शेतकऱ्यांपैकी आजपर्यंत (दि.17) 95 टक्के म्हणजे एकूण 1,01,829 शेतकऱ्यांची माहिती वेब पोर्टलवर अपलोड करण्यात आली, तसेच 1097 शेतकऱ्यांचे आधार सिडींग करावयाचे बाकी असल्याची माहिती अग्रणी बँकेचे जिल्हा उपप्रबंधक नारायणे यांनी यावेळी दिली.
०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी