पोहरादेवीला आंतरराष्ट्रीय वनपर्यटन साकारण्यासाठी वनमंत्री राठोड यांची मध्यप्रदेश, बिहारला भेट





यवतमाळ, दि. 20 : महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी (जि. वाशीम) येथील वनपर्यटन विकासाच्या अनुषंगाने नुकतीच मध्यप्रदेश ट्रायबल म्युझिअम येथे भेट दिली. येथील आदिवासींच्या  संग्रहालयास  भेट देऊन याच धर्तीवर पोहरादेवी येथे  बंजारा समाजाचे म्युझिअम उभारण्याबाबत पडताळणी केली. पोहरादेवी विकास आराखड्यात देशातील विविध समाजच्या धर्तीवर नाविन्यपूर्ण बाबी समाविष्ट करण्यासाठी संजय राठोड यांनी मध्यप्रदेश, बिहारमधील पटणा येथे भेट देऊन पाहणी केली. पोहरादेवी तीर्थक्षेत्र हे राष्ट्रीय आणि जागतिक दर्जाचे व्हावे, यासाठी   श्री .राठोड यांनी प्रथमपासूनच प्रयत्न चालविले आहेत.
या दौऱ्यात त्यांनी भोपाळ येथील भारतीय वन प्रबंध संस्थानमध्ये भेट देऊन येथील कामकाज समजून घेतले. वनांसंदर्भात संशोधन व अभ्यास करणारी देशातील ही एकमेव संस्था आहे. या भेटीत वनमंत्री श्री राठोड  यांनी महाराष्ट्रात शेतीस लागून असलेल्या जंगलामधून येणारे रोही,  रानडुक्कर आदी वन्यप्राणी यांचा शेतकऱ्यांना होणारा त्रास व शेतीचे होणारे नुकसान यावर काही प्रतिबंध करता येईल का, यावर काही ठोस उपाययोजना करता येईल का, या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र वनसेवेतील अधिकारीही उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी