जिल्ह्यातील 98 हजार खातेदारांचा डाटा अपलोड



v  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
यवतमाळ दि. 11 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 98 हजार खातेदारांचा डाटा आतापर्यंत अपलोड करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व बँकर्सची आढावा बैठक घेतली.
यवतमाळ जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेकरीता पात्र बँक खात्यांची संख्या 1 लक्ष 10 हजार 947 आहे. यापैकी दि. 11 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील सर्व बँका व त्यांच्या शाखांमार्फत एकूण 98 हजार 74 खातेदारांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे. यात सर्वाधिक 25555 खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 19074 खातेदार, युनियन बँक ऑफ इंडियाचे 12898 खातेदार, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे 12819, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे 9861 खातेदार तसेच इतर बँकांचा समावेश आहे.
खातेदारांचा डाटा अपलोड करतांना बँकांना काही अडचणी आहेत का, असे विचारून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व माहिती अपलोड करावयाची आहे. तसेच यानंतर बँकांनी व तहसीलदारांमार्फत चावडीवर, ग्रामपंचायत स्तरावर, आपले सरकार सेवा केंद्र आणि सीएससी सेंटरवर सदर याद्या लावाव्यात. एखाद्या गावात जास्त खातेदार असेल तर त्या गावात सीएससी केंद्राची संख्या वाढविण्याचे नियोजन करावे. सीएससी केंद्रावर एकाच वेळी शेतक-यांची गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपनिबंधक अर्चना माळवे यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी