गावखेड्यात समृध्दीचे वातावरण निर्माण करण्यास कटिबध्द - पालकमंत्री संजय राठोड


                                          
Ø चोरखोपडी येथे सिंचन तलाव दुरुस्ती कामाचा शुभारंभ
यवतमाळ, दि. 23 : नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे काम आहे. सार्वजनिक विकासापेक्षा प्रत्येक कुटुंब आनंदी व गावात समृध्दी असेल तर तो खरा विकास आहे. असा विकास करणे हे आपले स्वप्न आहे. त्यामु          ळे प्रत्येक गावखेड्यात समृध्दीचे वातावरण निर्माण करण्यास आपण कटिबध्द आहोत, अशी ग्वाही राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
दारव्हा तालुक्यातील चोरखोपडी येथे सिंचन तलावाच्या विशेष दुरुस्ती कामाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, दारव्हा पंचायत समिती सभापती सुनिता राऊत, उपसभापती नामदेव जाधव, जि.प. सदस्या आश्विनी कुरसंगे, पं.स.सदस्या सविता जाधव, चोरखोपडीच्या सरपंचा गिता जाधव, उपसरपंच गजानन जवके, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सुरज शिंदे आदी उपस्थित होते.
सिंचन तलावाच्या कामाची दुरुस्ती योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे, असे सांगून श्री. राठोड म्हणाले, अभियंत्यांनी कामाचे डिझाईन व अंदाजपत्रक दाखवावे. गावक-यांनी केलेल्या सत्कारामुळे आपण भारावून गेलो आहो. गावक-यांचा मी सदैव ऋणी राहील. साधा आमदार ते कॅबिनेट मंत्रीपद हे केवळ गावक-यांच्या आशिर्वादामुळेच शक्य झाले आहे. त्यामुळे आता बोलण्यापेक्षा विकासाच्या कृतीवर आपला भर राहील. गावखेड्यातील प्रत्येक कुटुंबात आनंद व समृध्दीचे वातावरण निर्माण करणे, हेच आपले ध्येय आहे. युवकांच्या हाताला काम, महिलांना प्रोत्साहन, चांगले आरोग्य, दर्जेदार शिक्षण, सिंचन व्यवस्था, बेरोजगारीवर मात यासारख्या विकासाच्या गोष्टी मार्गी लावायच्या आहेत, असे ते म्हणाले. यावेळी गावक-यांच्या वतीने पालकमंत्री संजय राठोड यांची लाडूतुला करण्यात आली.  
चोरखोपडी सिंचन तलावाचे काम जि.प. सिंचन विभागाने रोजगार हमी योजनेतून सन 1985-86 मध्ये पूर्ण केले. 16 ऑगस्ट 2018 रोजी दारव्हा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (45 मिनिटांत 132 मिमी.) धरणाच्या बुडीत क्षेत्रातील पाणीपातळी धरणाच्या माथा पातळीपर्यंत गेली होती. त्याअनुषंगाने धरणाची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 49.98 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चोरखोपडी येथील सिंचन तलावाच्या धरण भिंतीची लांबी 220 मीटर असून महत्तम उंची 13.70 मीटर आहे. या धरणांतर्गत सिंचनाचे क्षेत्र 70 हेक्टर आहे.
00000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल