नाफेडमार्फत 9 केंद्रांवर तुर खरेदी सुरू


14 फेब्रुवारीपर्यंत नोंदणीची मुदत
यवतमाळ दि.07 : खरीप हंगाम 2019-20 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत जिल्ह्यातील 9 केंद्रांवर तुर खरेदी सुरू आहे. नाफेड च्या वतीने जिल्ह्यातील पांढरकवडा, नेर, दिग्रस, बाभुळगाव, महागाव येथील तालुका खरेदी विक्री संस्था, दारव्हा येथील विविध कार्यकारी सोसायटी, आर्णी तालुक्यातील दत्त रामपुर येथील शेतकरी कृषी खाजगी बाजार, मारेगाव येथील महावीरा ॲग्रीकेअर (प्रा.लि.) व पुसद तालुक्यातील सेलु (बु.) येथील किसान मार्केटयार्ड या 9 केंद्रांवर रुपये 5800/- प्रति क्विंटर दराने नवीन तुर खरेदी सुरू करण्यात आली असून शासनाच्या पुढील आदेशापर्यंत तुर खरेदी सुरू राहणार आहे.
तुर खरेदीचा नोंदणी कालावधी 14 फेब्रुवारी पर्यंत असून शेतकरी नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. याकरिता शेतकऱ्याचे आधार कार्ड, सात-बारा उतारा, पिक पेरा, बँकेचे पासबुक आवश्यक राहणार आहे. खरेदी होणाऱ्या मालाचा खरेदी केंद्रावरील व वाहतुकीवरील ट्रान्झीट विमा नाफेड घेणार असून खरेदी केलेल्या मालाचे चुकारे ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात येणार आहेत.
खरेदी सुरू करण्यापुर्वी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करण्याच्या सूचना संबंधीत खरेदी केंद्रांना देण्यात आल्या आहे. खरेदी केंद्रांनी आधारभुत दर, खरेदी केंद्राचे नाव, खरेदी सुरू होण्याची तारीख, नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे, खरेदी केंद्राचे मॅनेजर, जिल्हा पणन अधिकारी, नाफेड कार्यालय व मार्केटिंग फेडरेशन यांचे नाव व संपर्क पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी माहिती असलेले बोर्ड दर्शनी भागात लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे यांनी कळविले आहे.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी