पोस्को व बाल न्याय अधिनियमबाबत जनजागृती करा – जिल्हाधिकारी



v जिल्हा बाल संरक्षण समितीची आढावा बैठक
      यवतमाळ, दि. 27 : बालकांवर कोणत्याही प्रकारचे अत्याचार होऊ नये व त्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व बाल न्याय अधिनियमबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा बाल सरंक्षण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी भाग्यश्री विस्पुते, वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनोद पाटील, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त किशोर भोयर आदी उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, जिल्हा बाल संरक्षण समितीच्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समन्वय ठेवून काम करावे. लैगिंक अत्याचाराची प्रकरणे कमी करणे, बाल न्याय अधिनियमबाबत जनजागृती करणे हा मुख्य उद्देश सर्व यंत्रणांचा असला पाहिजे. चार-चार तालुक्यांची कार्यशाळा घेऊन सरपंच, ग्रामसेवक व इतर नागरिकांना पोस्को कायद्याबाबत माहिती द्या. अधिकारी व कर्मचा-यांची समिती गठीत करून गाव बाल संरक्षण समिती, तालुका बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून जनजागृती करा. प्रत्येक समितीला जबाबदारी द्या. प्रत्येक पाच महिन्यांचा टास्क तयार करून त्याबाबत नियोजन करा, आदी सुचना त्यांनी उपस्थित यंत्रणेला दिल्या.
            यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी