पांदण रस्त्यांसाठी 22.50 कोटी जिल्हा परिषदेकडे वर्ग


v वेळेत निधी खर्च करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
यवतमाळ दि.12 : गावखेड्यांच्या दृष्टीने पालकमंत्री पांदण रस्ता योजना अतिशय महत्वाची आहे. या योजनेशी संबंधित सर्व मान्यता स्थानिक स्तरावरच देण्याची तरतूद असल्यामुळे 22.50 कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे. हा निधी वेळेत खर्च करण्याच्या सुचना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.
सन 2018-19 या वर्षातील पालकमंत्री पांदण रस्ते योजनेअंतर्गत 22.50 कोटींचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला असून खर्चाची मुदत 31 मार्च 2020 पर्यंत आहे. याबाबतची कामनिहाय माहिती सादर करून खर्चाचे नियोजन करावे. गावागावातील इंग्रजकालीन पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन कामे त्वरीत करून घ्यावीत. अ, ब आणि क अशी वर्गवारी असलेली पांदण रस्त्यांची सर्व कामे वेळेत पूर्ण करा, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
सन 2019-20 वर्षाकरीता प्राथमिक शाळांच्या इमारत बांधकामासाठी तीन कोटी रुपये मंजूर तरतूद करण्यात आली होती. पुनर्विनियोजनाद्वारे यात दोन कोटींची वाढीव तरतूद प्रस्तावित केली असून एकूण पाच कोटींची तरतूद आहे. मात्र या कामांचे नियोजन अद्यापही जिल्हा परिषदेकडून प्राप्त न झाल्यामुळे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी कामांची यादी पाठवून मंजूरी घ्यावी, अशा सुचनाही त्यांनी केल्या.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी