आशा स्वयंसेविका व कायाकल्प पुरस्कार वितरण



यवतमाळ, दि. 26 : आरोग्य विभाग, जिल्हा परिषदतर्फे बचत भवन येथे जिल्हास्तरीय आशा स्वयंसेविका व कायाकल्प पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती श्रीधर मोहोड तसेच प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण सभापती विजय राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बाळासाहेब चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते कायाकल्प प्रथम पुरस्कार 2 लक्ष रूपये प्राथमिक आरोग्य केंद्र पहापळची चमू डॉ. हर्षल पदोळे व ता.आ.अ. डॉ.संजय मडावी तर प्रोस्ताहनपर पुरस्कार 50 हजार प्राथमिक आरोग्य पहापळ राहुल तायडे यांना व ग्रामीण रुग्णालयस्तरीय प्रोत्साहनपर पुरस्कार 50 हजार रुपये, उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण डॉ.पी.एस. चव्हाण यांनी जिल्ह्यात 2373 आशामार्फत ग्रामीण भागात सुखरूप प्रसूती स्तनपान, लसीकरण, एनसीडी इत्यादी 73 प्रकारची आरोग्य सेवेची विविध कामे तसेच दिवसेंदिवस आरोग्याच्या नवनवीन योजनेत आशाचे अधिक महत्व असल्याबाबत सांगितले. अध्यक्षनिहाय भाषणात श्रीधर मोहोड म्हणाले, माणवाच्या जिवनामध्ये आरोग्य हे सर्वात मोठे धन असते आणि आशा ही ग्रामीण भागातील खरी आरोग्यदुत असल्याचे सांगितले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बाळासाहेब चव्हाण म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेमध्ये आरोग्याबाबत जागृती निर्माण करून शारिरीकदृष्ट्या ग्रामीण समाज सक्षम ठेवण्याचे दृष्टीने आशा सेविकांची कामगिरी ही अत्यंत महत्वाची आहे. अत्यंत कमी मानधनावर ह्या आशा सेविका गेली अनेक वर्ष ग्रामीण जनतेला सेवा देत आहे. याप्रसंगी डॉ.तरंगतुषार वारे, डॉ.संगर्श राठोड यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हास्तरीय आशा पुरस्कार प्रथम म्हसोला ता. आर्णी येथील नंदा जयसिंग राठोड तर द्वितीय भोयर ता. यवतमाळ येथील अल्का शिंदे नाविण्यपूर्ण प्रथम पुरस्कार करंजी ता. मारेगाव येथील चंदा मडावी यांना गटप्रवर्तकात प्रथम क्रमांक सुजाता बगाटे, द्वितीय योगीता पवार तर तृतीय क्रमांक संगीता आडे सोबत विविध स्तरावरील एक से एक जनांना पुरस्काराची अधिकृत रक्कम मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन पोर्णिमा गजभिये व प्रशांत पाटील यांनी केले तर आभार वैशाली कागदे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ.मनोज तगडपल्लीवार, डॉ.प्रिती दुधे, डॉ.प्रशांत पवार, कल्याणी महाडीक, धम्मदीप गायकवाड, नितीन ठाकूर, प्रशांत भोयर, सचिन विरुळकर, सुधीर उजवणे तसेच तालुका आरोग्य अधिकारी कर्मचारी व सर्व आशा उपस्थित होत्या.
00000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी