ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश

यवतमाळ, दि.16 (जिमाका) : ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार दि. 5 नोव्हेंबर रोजी मतदान व 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सदर निवडणूक शांततेत पार पाडण्याकरीता महाराष्ट्र देशी दारू नियम 1973 चे नियम 26(2) व विदेशी मद्य नियम (सेल ॲन्ड कॅश) नियम 1969 चे नियम 9 ए (2)(सी)(2) मधील तरतुदीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक आहे, त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या सीएल-3, एफएल-2, सीएलएफएलटिओडी-3, एफएलबिआर-2 एफएल -3, सिएल-2, अनुज्ञप्ती खालीलप्रमाणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार मतदानाच्या अगोदरच्या दिवस दि. 4 नोव्हेंबर, मतदानाच्या दिवस 5 नोव्हेंबर, मतमोजणीचा दिवस 6 नोव्हेंबरला जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक आहे, त्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील अनुज्ञप्ती पूर्ण दिवस बंद राहील. तसेच दि. 6 नोव्हेंबर रोजी ज्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी आहे, त्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या हद्दीतील अनुज्ञप्ती मतमोजणीचा निकाल लागेपर्यंत बंद राहील. बंदच्या कालावधीत अनुज्ञप्ती मद्य विक्रीसाठी उघडी ठेवू नये. तसे आढळून आल्यास संबंधित अनुज्ञप्ती व अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कडक कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी