जागतिक मानसिक आरोग्य दिनी कायदेविषयक जनजागृती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि लोकमित्र ट्रस्टचा पुढाकार

यवतमाळ, दि.13(जिमाक) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि लोकमित्र ट्रस्टचा पुढाकाराने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत नाकापार्डी येथे मंगळवारी करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशावरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या जनजागृती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश के.ए. नहार तर अध्यक्षस्थानी नाकापार्डी येथील ग्रामपंचायत सदस् मेघश्याम भवरे हे होते. यावेळी लोकमित्र ट्रस्ट फॅार ह्युमन डेव्हलपमेंट संचालक मिलिंद वंजारे, सचिव रत्नदिप गंगाळे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना डहाके, शिक्षिका वैशाली भगत, नाकापार्डी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॅा. सचिन माळवी आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मिलिंद वंजारे, संचालक, लोकमित्र ट्रस्ट फाॅर हयुमन डेव्हलपमेंट, यवतमाळ यांनी केले. यावेळी त्यांनी 3 तासापेक्षा जास्त मोबाईल इंटरनेट कोणत्याही कारणाशिवाय वापरल्यास काय दुष्परिणाम होवू शकतात याबाबत विस्तृत अशी माहिती दिली. मानसिक आजार कसा उद्भवतो व लक्षणे कशी ओळखायची याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे मार्गदर्शक के.ए. नहार म्हणाले की, मोबाईलचा वापर हा योग्य कामासाठी करा जेणेकरून आपल्याला शारिरीक दुष्परिणाम होणार नाही. त्यामुळे आपले मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. मानसिक ताणतणावामध्ये न राहता मैदानी खेळ तसेच आवडीच्या खेळामध्ये सहभागी होवून आनंदी राहावे. सर्वांनी आपल्या भोवताल किंवा घरी मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना चांगली वागणूक द्यावी, असे यावेळी सांगितले. यावेळी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेमघ्ये सहभाग घेवून मोबाईल व्यसन विषयासंदर्भात उत्कृष्ट चित्र रेखाटनाऱ्या 21 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकमित्र ट्रस्टचे उपाध्याक्ष प्रकाश बहादे यांनी केले तर सचिव रत्नदिप गंगाळे यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी