13 ऑक्टोबर रोजीच्या पं. दीनदयाळ उपध्याय रोजगार मेळाव्याबाबत आवाहन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ अंतर्गत मॉडेल करीयर सेंटरमार्फत दि.13 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला पं. दीनदयाळ उपध्याय रोजगार मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्याचे आयोजन जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय जवळ, तुळजापूर हायवे लगत, गट नं. 109 किन्ही, यवतमाळ येथे शासन आपल्या दारी या उपक्रमातंर्गत करण्यात आलेले होते. हा रोजगार मेळावा काही अपिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेला असून रोजगार मेळाव्याची सुधारित दिनांक व ठिकाण कळविण्यात येईल, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त वि. सा शितोळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल