डाक योजनांच्या जनजागृतीसाठी डाक सप्ताहाचे आयोजन

भारतीय डाक विभागाच्यावतीने संपूर्ण देशभरात डाक सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ डाक विभागाच्यावतीने दि. 9 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. हा डाक सप्ताह 13 ऑक्टोबरपर्यंत राबविला जाणार असून या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डाक विभागाच्या विविध योजना तसेच डाक खात्याच्या कार्यप्रणालीची माहिती जनतेला देवून जनजागृती करणे हा या मागचा उद्देश आहे. राष्ट्रीय डाक सप्ताहाचे निमित्ताने दि. 11 ऑक्टोबर रोजी डाक विभाग, यवतमाळ व डाक तिकीट संग्रह संघ, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्मिळ अशा डाक तिकीटांचे भव्य प्रदर्शन महिला विद्यालय, महादेव मंदिर रोड, यवतमाळ येथे आयोजित करण्यात येत आहे. डाक तिकीट संग्रह करणे व त्यामधून आपल्या देशातील थोर क्रांतिकारी पुरुषांची, समाजसेवकांची माहिती तसेच कला, संस्कृती याची माहिती व्हावी हा या प्रदर्शनी मागचा मुख्य हेतू आहे. या प्रदर्शनीमध्ये निशुल्क प्रवेश आहे. या प्रदर्शनीला जनतेने तसेच शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे भेट देऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन यवतमाळ विभागाचे डाकघर अधीक्षक गजेंद्र जाधव, डाक तिकीट संग्रह संघाचे समन्वयक डॉ. योगेंद्र मारू यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी