नवदाम्पत्यांना आर्थिक सहाय्यासाठी कन्यादान योजना ; सामूहिक विवाह सोहळ्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, दिग्रस, आर्णी, दारव्हा, उमरखेड व नेर या सात तालुक्यातील आदिवासी भागातील विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या नवदाम्पत्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी कन्यादान योजना राबविण्यात येत आहे.
इच्छुक व पात्र सेवाभावी स्वयंसेवी संस्था यांनी चालु आर्थिक वर्षाकरिता कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यासाठी विहित नमुन्यातील आवेदन व परिपूर्ण प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, उपजिल्हा रुग्णालयजवळ, संत सेवालाल चौक, पुसद येथे दि. 31 ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. या योजनेच्या निकषनुसार वर व वधु यांचे वय विवाहाच्या दिनांकास 35 वर्षांपेक्षा जास्त असू नये,  वधुवराचा प्रथम विवाह असणे आवश्यक आहे. नवदाम्पत्यापैकी एकजण अनुसूचित जमातीचा असावा,विवाह नोंदणी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र व जोडप्यापैकी एकाचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायदा अंतर्गत कोणत्याही कलमाचा भंग झाले नसल्याचे प्रतिज्ञापत्र, विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे, वधु व वराचे बँक खाते क्रमांक जोडणे आवश्यक आहे. विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रति 10 जोडपे 10 हजार रूपये व लग्न सोहळ्यात भाग घेणाऱ्यास 10 हजार रूपये इतके अनुदान धनादेश किंवा पे ऑर्डरव्दारे देण्यात येईल, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी