जवाहर नवोदय विद्यालयात नववीसाठी प्रवेश अर्जाची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत

घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रम असलेल्या इयत्ता 9 वी तील रिक्त जागांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत असून प्रवेश अर्ज ऑनलाईनच मागविण्यात आले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा शनिवार दि. 10 फेब्रुवारी 2024 रोजी जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा ता. घाटंजी, जि. यवतमाळ तसेच आवश्यकता असल्यास अन्य परीक्षा केंद्रावर होणार आहे. या परीक्षेसाठी एक तास अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नवोदय विद्यालयाच्या www.navodaya.gov.in या वेबसाईटवर ॲडमिशन या टॅबमध्ये उपलब्ध आहे. तसेच परीक्षेसाठी लागणारी विस्तारीत माहिती देखील उपलब्ध करण्यात आहे. या परीक्षेसाठी लागणाऱ्या पात्रतेनुसार विद्यार्थी शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये इयत्ता 8 वी मध्ये शिकत असावा. यवतमाळ जिल्ह्यातील शासन मान्यताप्राप्त शाळेचाच विद्यार्थी असावा. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी इयत्ता 8 वी ची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, असे विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र राहणार नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना 2024-25 या शैक्षणिक वर्षसाठी इयत्ता 9 वीमध्ये जवाहर नवोदय विद्यालयात ऑनलाईन प्रवेश अर्ज भरायचे आहे, अशा विद्यार्थ्यांचा रहिवासी जिल्हा आणि इयत्ता 8 वी मध्ये शिकत असलेला जिल्हा हा एकच असावा. तसा विद्यार्थी त्याच जिल्ह्यात प्रवेश अर्ज करू शकणार आहे. यासोबतच विद्यार्थ्याचा जन्म दि. 1 मे 2009 ते 30 एप्रिल 2011 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. ही अट अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसह सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागु आहे. याविषयी अधिक माहितीसाठी नवोदय विद्यालयाच्या वेबसाईटवर संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य के. डी. धोपटे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी