प्रधानमंत्र्यांच्या हस्ते यवतमाळातील २० ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन

राज्याच्या ग्रामीण भागातील युवक-युवती, महिलांना कौशल्य प्रदान करण्यासाठी व उद्योजकता निर्माण होण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील २० प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे ॲानलाईन उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते अाज करण्यात आले.
राज्यातील ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा उद्घाटन समारंभ ॲानलाईन आयोजित करण्यात आला होता. या समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तसेच जिल्ह्यातील वीस केंद्रांच्या ठिकाणाहून लोकप्रतिनिधी, युवक-युवती, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील तिवसा, जवळा, लाडखेड, कलगाव, काळी दौलत, शेंबाळपिंपरी, मुळावा, सोनवाढोणा, इंद्रठाणा, हातोला, पाटणबोरी, चिखलगाव, पाटण, मुकुटबण, राणी अमरावती, खापरी, पारवा, जोडमोहा, वेगाव आणि झाडगाव या २० केंद्रांचे ॲानलाईनरित्या एकाचवेळी उद्घाटन झाले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी